नवी पुस्तके

स्थापण्या समता शांती ठेवुनी शुद्ध साधना !
करिती साधना त्यांना ठेवो उत्स्फूर्त साधना !!

महात्मा गांधीची विचारसृष्टी

 • आजच्या ह्ष्टिकोनातून केलेला साधक-बाधक विचार या पुस्तकात आहे, गांधींकडे पाहण्याचा निराळा ह्ष्टिकोन यातून मिळतो.

  लेखक : यशवंत सुमंत

  किंमत : १२५ रुपये

  पृष्ठे : १३६

थर्ड अँगल

 • एक थिअरॉटिकल मित्र प्रॅक्टिकल मित्रांशी बोलतोय, अशी या सदराची मध्यवर्ती कल्पना होती. त्यामुळे अनेक लेखकांचे, पुस्तकांचे संदर्भ येणं  अपरिहार्य होतं.

  लेखक : विनोद शिरसाठ

  किंमत : ५० रुपये

  पृष्ठे : ६४

इस्लामचे भारतीय चित्र

 • या लेखमालेला भारतीय फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमांची व १९६५ च्या भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी होती. आणि १९७१ चे भारत-पाक युद्ध व पाकिस्तानच्या विभाजानाच्यापूर्वीच्या खदखदणाऱ्या परिस्थितीचे संदर्भ होते. जवळपास ५० वर्षापूर्वीचे हे लेखन आता का वाचायचे ? तर हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या संदर्भातील गुंतागुंत काही अंशी समजून घेण्यासाठी आणि तो गुंता किती कमी झाला आहे व आणखी कमी कसा होईल, या बाबतच्या अंदाजांना चालना देण्यासाठी !

  लेखक : हमीद दलवाई

  किंमत : ५० रुपये

  पृष्ठे : ६८

   

जमीला जावाद

 • या दहा कथा साधना, मराठवाडा, सत्यकथा, वसुधा, नवयुग या नियतकालिकांच्या दिवाळी अंकातून किंवा विशेषांकातून प्रसिध्द झालेल्या आहेत. त्या नियतकालिकांचे तत्कालीन संपादक अनुक्रमे यदुनाथ थत्ते, अनंतराव भालेराव, श्री. पु. भागवत, विजय तेंडूलकर, आचार्य आत्रे असे रथी-महारथी होते;

  हे लक्षात घेतले तर या कथेच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करणे मोठ्या धाडसाचे ठरेल.

   

  लेखक : हमीद दलवाई

  किंमत : १०० रुपये.

  पृष्ठे : ११२

रिंगणनाट्य

 • हे पुस्तक म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला आम्ही केलेले विनम्र अभिवादन आहे. डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर आम्हाला कृतिशील,सनदशीर आणि सर्जनशील निषेध व्यक्त करायचा होता. गेली तीन वर्षे आणि तो 'अंनिस'लोकरंगमंचाचे सारे कार्यकर्ते 'रिंगण'च्या माध्य्मातून महाराष्ट्रभर तळमळीने व्यक्त करीतच आहेत. हा आमच्या वेदनांचा विलाप आहे. हा आमच्या अस्वस्थेतेचा हुंकार आहे. हा आमच्या विचारांचा उद्गार आहे. हा आमच्याविवेकाचा जागर आहे. /p>

   

  किंमत : १५०रुपये.

  पृष्ठे : १८०

प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे

 • ८ एप्रिल २०१३ रोजी,पुणे येथील एस.एम.जोशी सोशलिस्ट फॉउंडेशनच्या सभागृहात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची मुलाखत "प्रश्न तुमचा,उत्तर दाभोलकरांचे" या शीर्षकाखाली झाली. डॉ दाभोलकरांना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातील कार्यक्रमांत विविध स्तरांतील लोकांकडून विचारले जाणारे निवडक २५ प्रश्न या मुलाखतीत विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तरे अतिशय थोडक्यात, पण नेमकेपणाने दिली गेली आहेत. या मुलाखतीच्या डीव्हीडीच्या हजारो प्रती वितरित झाल्या आहेत. मात्र ती संपूर्ण मुलाखत कागदावर प्रथम आली आहे. 

   

  किंमत : ५० रुपये.

  पृष्ठे : ६८

कोSहम

 • सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल या गुरु - शिष्याच्या परंपरेने ग्रीक तत्वज्ञानाच पाया घातला. जगभरचे तत्व चिंतन या परंपरेला वंदन करीत आले. त्यापैकी प्लेटोने त्यांचे तत्वज्ञान दोन भिन्न शैलीत मांडले. पहिली सूत्रबद्ध आणि ग्रांथिक, तर दुसरी नाटकाच्या रोंचक रूपातली . पहिली रचना अभ्यासकांसाठी, तर दुसरी सर्वसाधारण वाचकांसाठी. काळाचा महिमा असा कि, त्याच्या अकादमीला लागलेल्या आगीत त्याची सूत्रबद्ध रचना जळून नाहीशी झाली. लोकांच्या भाषेत लिहिलेले त्याचे चिंतनच तेवढे पुढे टिकले. त्याच चिंतनाने तत्वज्ञ म्हणून प्लेटोला अजरामर केले. ज्ञान हा शैलीने बाधित न होणारा जनसामान्यांचा हक्क आहे, हा या घटनेचा अर्थ... 'कोSहम' हि कादंबरी त्या दिशेने प्रवास करणारी.....
  किंमत २०० रुपये
  पाने २१२

पूर्णसत्य

 • पण ती धार बोथट करायला अनेक शतकांपासूनच्या रूढी मैदानात उतरल्या होत्या. 
  याच काळात डॉ. आंबेडकरांसारखा बलवान योद्धा वाटाडया म्हणून मला लाभला... 
  बाबासाहेब उपाशी राहून शिकले. मनाच्या/बुद्धीच्या भुकेसाठी त्यांनी 
  पोटाच्या भुकेला दाबून टाकलं  होतं. त्यामुळे माझ्या घरात त्यांचा फोटो तर होताच,
  पण खिशातही त्यांचा फोटो मी ठेवीत असे. तो फोटो मला सदैव प्रेरणा देत असे.
   

  पृष्ठे – २९०

  किंमत – २५० रुपये

   

मी भरून पावले आहे

 • कुठल्याही प्रकारचा त्रास दलवाईंना आपल्याकडून होता कामा नये, हे लक्षात ठेवून मी चालण्याचा प्रयत्न करीत होते... ३ मे १९७७ रोजी दलवाईंचा मृत्यू झाला. शेवटी शेवटी ते मला दोन तीनदा म्हणाले, "मेहरू, आज मी जो काही आहे तो तुझ्यामुळेच... " यांच्यातच मी सगळं भरून पावले आहे.

   

  पृष्ठे – २०८

  किंमत – २०० रुपये

भारतातील मुस्लिम राजकारण

 • बांधवांच्या पूर्वग्रहांना आणि अंधश्रद्धांना उत्तेजन देणं, असाच त्यांचा अर्थ होतो, हे माहीत असूनही तो तसंच जगणं पत्करतो. त्यामुळेच, दलवाई भारतातील मुस्लिम समाजाच्या अनिष्ट रूढीपरंपराविरोधात एकांडया शिलेदारासारखे लढा देत आहेत; म्हणजे एक प्रकारे, एकहाती धर्मयुद्ध करत आहेत असंही आपण म्हणू शकतो. -अ . भि . शहा. पाने-१६० किंमत-१५०

कालपरवा

 • म्हणजे " कालपरवा " हे गुहा यांच्या कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद नसून, स्वतंत्र पुस्तक आहे. इतिहास, राजकारण, समाजकारण, पर्यावरण आणि क्रिकेट या पाचही क्षेत्रांत संशोधनपर तरीही ललितरम्य लेखन करणे हा रामचंद्र गुहा यांचा सर्वांत महत्वाचा गुणविशेष आहे. इतिहास जिवंत करून वर्तमानाशी त्याचे धागे जुळवणे किंवा जुळू शकणारे धागे दाखवणे ही त्यांची खासियत आहे, याचा प्रत्यय या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचताना येईल. पाने-१५२ किंमत-१५०

तीन मुलांचे चार दिवस

 • आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावात/पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले. चार दिवसांनंतर (पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर) त्यांना सोडून देण्यात आले. तोपर्यंत "तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या" महाराष्ट्रत झळकल्या... आणि त्यांचा सुटकेसाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न जारी करण्यात आले. त्या तीन तरुणांची "त्या"चार दिवसांची डायरी, त्या सफारीचे मागचे पुढचे संदर्भ, प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले, आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक. पाने-१५२ किंमत -१५०

हिंदभक्त विदेशीनी

 • सोफिया वाडिया यांच्या कथेने शेवट. तसे पहिले तर या देशात काही पाश्र्चिमात्य महिला एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपासून येत होत्या. त्या सर्व युरोप अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या मशिनमधून आलेल्या नन्स होत्या. त्यापैकी काहींनी शिक्षण,आरोग्य,धर्मप्रचार अशी मशीनने त्यांना नेमून दिलेली कामे केली. या एकादश महिलांचे महत्व हे त्यांच्या हिंददेशावरील निष्ठेमुळे आहे-नव्हे भारतभूमी ही त्यांची जीवननिष्ठाच होती. या देशाचे स्वातंत्र्य,महिला उन्नती,बालकांचे अधिकार व शिक्षण, विकास या सर्वांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न श्रेष्ठ आहेत. त्यांची ओळख भारतीय जनतेला करून देऊन त्यांना कृतज्ञतेचा  प्रणाम करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे
   

  पृष्ठे – १२०

  किंमत – १०० रुपये

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहणे

 • परंतु तिघांनीही एकत्र ऐकण्याची संधी 
  १५ जानेवारी २०१७ रोजी पुणे शहरातील 
  बालगंधर्व रंगमंदिरात मिळाली.
  पूर्ण दोन तास चाललेल्या त्या संपूर्ण मुलाखतीचे शब्दांकन ... 
  आणि मुलाखतीला पूरक ठरतील 
  अशा तीन लेखांचा समावेश करून 
  ही पुस्तिका आकाराला आली आहे.
   
  पाने-७४
  किंमत -५०

मधुघट

 • या साहित्य-शास्त्रकलेच्या उद्यानात मधुकर वृत्तीने रसास्वाद घेताना होणाऱ्या आनंदात वाचकांना सहभागी करून घ्यावे, या उद्देशाने मी लेखन करीत आलो आहे. अशा मधुने भरलेले हे काही मधुपट.


  लेखक - गोविंद तळवलकर


  किंमत -२०० रुपये 

डिकन्स आणि ट्रोलॉप

 • काही सर्वमान्य वैशिष्ट्ये आहेत. 
  या काळाचे प्रतिनिधी हा मान चार लेखकांना मिळतो. 
  चार्लस डिकन्स, जेन ऑस्टिन, विल्यम थॅकरे आणि अँन्थनी ट्रोलॉप. 
  यापैकी डिकन्सचे व्दिजन्मशताब्दी वर्ष २०१२ मध्ये तर 
  ट्रोलॉपचे व्दिजन्मशताब्दी वर्ष २०१५ मध्ये येऊन गेले. 
  त्या निमित्ताने लिहिलेल्या दोन दीर्घ लेखांचे हे पुस्तक आहे. 
   
   
  पाने -६८ 
  किंमत - ५०

कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा

 • हमीद दलवाई यांनी वय वर्षे २२ ते ३५ या काळात, म्हणजे १९५४ ते ६७ या दशकात लिहिलेले पाच लेख या पुस्तकात आहेत.मग आता हे लेखन का वाचायचे?तर भारताच्या फाळणीनंतरच्या दोन दशकांतील भारतीय मुस्लिम मानस दलवाईंना कसे दिसत होते, हे समजून घेण्यासाठी!

   

  लेखक - हमीद दलवाई

  पृष्ठे - ६४

  किंमत  - ५० रुपये

अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट

 • त्याचे नाव हमीद दलवाई. दिलीप चित्रे या मित्राने त्याचे वर्णन,
  "अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट" असे केले होते. 
  त्याच्या ध्येयवादाचा व दूरदृष्टीचा ट्रेलर पाहायचा असेल. 
  तर हे पुस्तक वाचायलाच हवे.
   
  पाने-११२
  किंमत-१२५

स्वामिनाथन

 • अधिकारी व चळवळीतील कार्यकर्ते या सर्वांना कृती सुचवतात. 
  जगातील वैज्ञनिक त्यांना  शास्त्रज्ञांचे तत्वज्ञ मानतात. 
  भिकेचे वाडगे घेऊन हिंडणारा देश ते अन्नधान्याबाबत 
  स्वावलंबी देश ही आपली वाटचाल हरित क्रांतीमुळे झाली . 
  त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढले,परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल नाही.
  हवामान बदल आणि बाजारभाव यांचे तडाखे सहन करणाच्या 
  शेतकरी आयोगाच्या अहवालातून स्वामिनाथन यांनी 
  कृतिआराखडा मांडला आहे.
   
  पाने-270 किंमत-250